📍 पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), महाराष्ट्र 📞 +91 96237 33305 ✉️ info@newsaraswatifoundation.org

संस्थेची अधिकृत कायदेशीर उद्दिष्टे

Official Constitutional Objectives & Memorandum of Association

"न्यू सरस्वती फाउंडेशन" पैठण या संस्थेच्या अधिकृत घटना व नियमावलीनुसार स्वीकृत ८ मुख्य क्षेत्रांमधील विस्तृत सामाजिक उद्दिष्टे.

📜 अधिकृत नोंदणीकृत उद्देश पत्र

महाराष्ट्र संस्था नोंदणी अधिनियम १८६० व मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० अन्वये स्वीकृत.

प्रमाणपत्र व कागदपत्रे पहा →

शिक्षण विषयक उद्देश

1. Educational Objectives & Vocational Training
कायदेशीर कलम १

अ) शाळा व महाविद्यालये स्थापना व व्यवस्थापन

  • बालवाडी, आंगणवाडी, बालसंस्कार केंद्र, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, इंग्रजी व सेमी इंग्रजी शाळा, कन्या शाळा, आश्रम शाळा, निवासी शाळा, रात्र शाळा, सैनिकी शाळा चालविणे. Establishing & running pre-primary, primary, secondary, English medium, residential & military schools.
  • कला, वाणिज्य, विज्ञान, महिला, चित्रकला, विधी, शास्त्रीय संगीत, ॲग्री बायोइन्फॉरमॅटिक्स, शाळा व्यवस्थापन, व्यवसाय व्यवस्थापन, कृषी व्यवसाय, इंटरनॅशनल स्कुल, सी.बी.एस.सी., बी.एस.डब्ल्यू., एम.एस.डब्ल्यू., बी.पी.एड., एम.पी.एड., डी.फार्मसी, एम.फार्मसी, डी.एम.एल.टी., वैद्यकीय, बी.ए., बी.कॉम., बी.एससी., बी.बी.ए., बी.सी.एस., बी.सी.ए., एम.बी.ए., अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक कॉलेज चालविणे. Operating Degree, Engineering, Pharmacy, Medical, Management & Polytechnic Colleges.

ब) विशेष बालसंगोपन व निवासी संस्था

  • नर्सिंग कॉलेज, डेंटल कॉलेज, पशुसंवर्धन डेअरी युनिट पदविका महाविद्यालय, बी.लिब., एम.लिब., डेअरी सायन्स विद्यालय चालविणे. Running Nursing, Dental, Dairy Science & Library Science institutes.
  • बालसदन, शिशुविहार, युवक कल्याण केंद्र, बालगृह, पुनर्वसन केंद्र, बालग्रंथालय, अनाथालय, निराश्रित बालकाश्रम, बाल मार्गदर्शन चिकित्सा केंद्र, दत्तक योजना, अंध, अपंग, अस्थिव्यंग, मुकबधीर मुलां-मुलींच्या निवासी शाळा व वृद्धाश्रम चालविणे. Operating orphanages, child guidance clinics, special schools for disabled children & old age homes.

क) तरुण-तरुणींना व्यावसायिक प्रशिक्षण

  • मोबाईल रिपेअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स, रेडिओ, टी.व्ही., एल.ई.डी., लॅपटॉप, शिवणकाम, टेलरिंग, भरतकाम, हस्तकला, चित्रकला, टंकलेखन, संगणक (सर्व कॉम्प्युटर कोर्सेस), ब्युटी पार्लर, ड्रायव्हिंग प्रशिक्षण देणे. Providing skill training in mobile repair, laptop hardware, computers, tailoring & beauty care.
  • शेळी पालन, कुक्कुट पालन, रेशीम उद्योग, मत्स्योद्योग, दालमिल, ऑईल मिल, पापड उद्योग, दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण देणे. Conducting training for goat farming, poultry, sericulture, dairy business & food processing.

ड & इ) अल्पसंख्याक विकास व तंत्रशिक्षण

  • उर्दू शाळा चालविणे. अल्पसंख्याक समाजासाठी असलेल्या केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना राबविणे आणि सार्वजनिक वाचनालय सुरु करणे. Running Urdu schools, minority welfare programs, and public libraries.
  • औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (आय.टी.आय.), व्यवसायाभिमुख प्रशिक्षण केंद्र (VTC), समाजकल्याण व आदिवासी विकास विभागाच्या निवासी शाळा व वस्तीगृहे चालविणे. Running ITI centers, vocational training centers, and tribal welfare hostels.

सामाजिक विषयक उद्देश

2. Social Welfare & Disaster Relief Objectives
कायदेशीर कलम २

अ) आपत्ती मदत व वंचित घटक सहाय्य

  • वृद्धाश्रम सुरु करणे, अंध, अपंग, मुक-बधीर, उपेक्षित घटकांना मदत करणे. Helping elderly, blind, deaf, mute & marginalized sections of society.
  • हुंडाबंदी, व्यसनमुक्ती मोहिमा राबवणे. नैसर्गिक आपत्ती (भूकंप, दुष्काळ, पूर) प्रसंगी अन्न, वस्त्र, निवारा, औषधी पुरवून पुनर्वसन करणे. Anti-dowry, de-addiction drives & emergency disaster relief during floods, drought or earthquakes.

ब) बालमजुरी निर्मूलन व साक्षरता

  • बांधकाम क्षेत्रात बालमजुरी करणारी मुले, हॉटेल, गॅरेजमध्ये काम करणाऱ्या लहान मुलांसाठी शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करणे. Rehabilitating child laborers from construction sites, hotels & garages through education.
  • वयस्क व निरक्षरांसाठी व्यापक साक्षरता अभियान व स्वयंरोजगार प्रशिक्षण आयोजित करणे. Running literacy campaigns and self-employment workshops.

क & ड) सामाजिक अनिष्ट प्रथा निर्मूलन व पायाभूत सुविधा

  • अंधश्रद्धा निर्मूलन, हुंडा पद्धती, अमली पदार्थ सेवनाविरुद्ध जनजागृती करून अनिष्ट प्रथांचे निर्मूलन करणे आणि एचआयव्ही-एड्स ग्रस्तांसाठी कार्य करणे. Eradicating superstitions, substance abuse, dowry system & spreading HIV/AIDS awareness.
  • ग्रामीण भागात रस्ते, पिण्याचे पाणी, शिक्षण, ग्रंथालय, आरोग्य, व्यवसाय प्रशिक्षण सोयी पुरवणे. Improving rural infrastructure, drinking water access, roads & community health facilities.

क्रीडा विषयक उद्देश

3. Sports, Gymnasiums & Physical Fitness Objectives
कायदेशीर कलम ३

अ) व्यायामशाळा व सुदृढ युवा पीढी

  • ग्रामीण व शहरी भागात अद्ययावत व्यायामशाळा (Gymnasiums/Fitness Centers) काढून तरुणांना नियमित व्यायामाचे व निकोप आरोग्याचे महत्त्व पटवून देणे. Establishing gymnasiums and fitness centers in rural and urban areas to emphasize youth physical health and athletics.
  • स्थानिक व जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून ग्रामीण गुणवंत खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देणे. Organizing sports tournaments and training camps for promising rural athletes.

कृषी विषयक उद्देश

4. Agriculture, Watershed & Farmer Welfare Objectives
कायदेशीर कलम ४

अ) जलसंधारण व आधुनिक तंत्रज्ञान

  • 'पाणी अडवा, पाणी जिरवा' कार्यप्रणाली अमलात आणून पाणलोट क्षेत्र विकासाच्या योजना राबवणे. Implementing 'Stop Water, Recharge Water' rainwater harvesting & watershed development.
  • शेतकऱ्यांना आधुनिक बियाणे, खते, औजारे व ठिबक सिंचन वापरण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शन शिबिरे आयोजित करणे. Educating farmers on modern tools, fertilizers, high-yield seeds & drip irrigation.

ब) सेंद्रिय शेती व नाबार्ड योजना

  • सेंद्रिय शेतीचा व्यापक प्रचार, कृषी विज्ञान केंद्र चालविणे, माती परीक्षण प्रयोगशाळा सुरू करणे, जलस्वराज व नाबार्ड (NABARD) अंतर्गत समाजउपयोगी योजना राबविणे. Promoting organic farming, establishing soil testing labs, Krishi Vigyan Kendra & NABARD schemes.
  • कृषी विकासासाठी तेलबिया उत्पादन कार्यक्रम राबवणे व नवीन शेती संशोधन प्रसार करणे. Conducting oilseed production programs and diffusing agricultural innovations.

क) पडीत जमीन विकास व गोडाऊन सुविधा

  • नाला बंडिंग, बंधारे, मृद संधारण, पाझर तलाव, हरितगृह (Greenhouse) निर्मिती व आयुर्वेदिक वनस्पती लागवड करणे. Constructing check dams, percolation tanks, greenhouses & medicinal plant cultivation.
  • शेतकऱ्यांना पिकाला योग्य भाव मिळेपर्यंत साठवणुकीसाठी गोडाऊन व शीतगृहे (Cold Storage) माहिती देणे आणि दुष्काळात चारा छावण्या चालवणे. Providing guidance on warehouses, cold storages for crop preservation & managing cattle fodder camps during drought.

पर्यावरण विषयक उद्देश

5. Environmental Protection & Ecology Objectives
कायदेशीर कलम ५

अ) वृक्षसंवर्धन व प्लास्टिक मुक्ती

  • कुऱ्हाड बंदी, चराई बंदी, व्यापक वृक्षारोपण व वृक्ष संगोपन उपक्रम राबविणे. Enforcing tree-cutting bans, grazing restrictions, mass afforestation & tree protection.
  • पर्यावरण प्रदूषणाचे गंभीर परिणाम समजून सांगणे, प्लास्टिक वापरापासून होणाऱ्या प्रदूषणाविषयी जनजागृती करणे. Raising awareness on pollution hazards and plastic waste reduction.
  • डोंगरी विकास योजना राबविणे, कुरण शाळा व फिरती शाळा स्थापन करून चालविणे. Implementing hill area development schemes and running mobile pasture schools.

कला विषयक उद्देश

6. Cultural, Arts & Folklore Preservation Objectives
कायदेशीर कलम ६

अ) सुप्त कलागुणांना वाव व पारंपरिक कला संशोधन

  • ग्रामीण व शहरी भागातील युवक-युवतींच्या सुप्त कलागुणांना वाव देणे. विविध भाषिक कवी संमेलन, कथाकथन, सुंदर हस्ताक्षर वर्ग व युवक महोत्सव भरविणे. Organizing poetry meets, storytelling sessions, handwriting workshops & youth cultural festivals.
  • आदिवासी, दलित, भटके-विमुक्त समाजाच्या पारंपरिक कलेचा अभ्यास व संशोधन करणे. नाटक, तमाशा व लोककलाकारांचा सन्मान करणे. Studying and researching folk art of tribal and nomadic communities; honoring traditional folk artists.
  • जनतेच्या निरोगी मनोरंजनासाठी कलाकेंद्र व मनोरंजन केंद्र चालविणे आणि कलाकारांसाठी शासकीय योजना राबविणे. Running community art centers and facilitating government welfare schemes for artists.

आरोग्य विषयक उद्देश

7. Healthcare, Medical Camps & Wellness Objectives
कायदेशीर कलम ७

अ) गंभीर आजार मदत व रक्तदान शिबीरे

  • कॅन्सर, किडनी आजारग्रस्त रुग्णांना वैद्यकीय मदतीसाठी सहकार्य करणे. एड्स व हिपॅटायटीस-बी कावीळ विषयी जनजागृती करणे. Assisting patients with cancer and kidney failure; spreading awareness on HIV/AIDS & Hepatitis-B.
  • कुटुंब नियोजन, रक्तदान शिबीरे, रक्तपेढी संचालन, नेत्र तपासणी व मोफत नेत्रदान शिबीरे आयोजित करणे. Organizing voluntary blood donation camps, operating blood banks & free eye examination camps.

ब) मोफत कृत्रिम साहित्य व निसर्गोपचार

  • अंध-अपंगांना मोफत कृत्रिम अवयव व साहित्याची सोय करून देणे. स्वच्छता उपक्रम, योगासन, ध्यानसाधना व हास्यक्लब शिबीरे घेणे. Distributing free artificial limbs/prosthetics to disabled individuals; conducting yoga & wellness camps.
  • निसर्गोपचार केंद्र (Naturopathy Center) स्थापन करणे आणि वैद्यकीय क्षेत्रातील छोटे-मोठे अभ्यासक्रम चालविणे. Establishing naturopathy wellness centers and offering paramedical courses.

महिला विषयक उद्देश

8. Women Empowerment & Family Counseling Objectives
कायदेशीर कलम ८

अ) महिला स्वावलंबन, आधार केंद्र व समुपदेशन

  • महिलांसाठी कला, शिक्षण, सौंदर्य सल्ला, शिवणकाम व व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र चालवणे. Operating women's vocational training centers in tailoring, handicrafts, and beauty services.
  • विधवा, परित्यक्ता व निराधार महिलांसाठी आधार केंद्र सुरू करणे व स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य मिळवून देणे. Setting up rehabilitation shelter homes and self-employment avenues for destitute women and widows.
  • कौटुंबिक समस्यांसाठी विनामूल्य समुपदेशन केंद्र (Family Counseling Center) चालवणे, महिला कायदेविषयक मार्गदर्शन शिबीरे व किशोरवयीन मुलींचे व्यक्तिमत्त्व विकास उपक्रम घेणे. Running free family counseling centers, legal awareness camps, and personality development drives for adolescent girls.

या सर्वोपयोगी सामाजिक कार्यात सहभागी व्हा!

आमच्यासोबत स्वयंसेवक म्हणून जोडा किंवा देणगी देऊन गरजू बांधवांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवा.

देणगी द्या (Donate Now) संपर्क साधा (Contact Us)